Site icon e लोकहित | Marathi News

Monsoon 2023 । बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी! राज्यात ‘या’ दिवशी होणार मान्सूनचे आगमन

Baliraja's anxiety-increasing news! Monsoon will arrive in the state on this day

Monsoon 2023 : बळीराजा अनेक दिवसांपासून आतुरतेने मान्सूनची वाट पाहत आहे. अशातच आता एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मान्सूनची नवीन तारीख जाहीर झाली आहे. केरळमध्ये जरी मान्सून दाखल झाला असला तरी तो राज्यात २३ जूनपासून सक्रिय होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. यापूर्वी एका खासगी हवामान संस्थेने यावर्षी राज्यात कमी पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे.

Urfi Javed । मोठी बातमी! उर्फी जावेद रस्त्यावर पडली अन् घडले धक्कादायक; व्हिडिओही झाला व्हायरल

त्यामुळे सर्वजण अस्वस्थ झाले आहेत. एल निनो आणि चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर गेला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता आणखी काही काळ पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जरी 10 जूनपर्यंत पाऊस केरळ आणि तळकोकणात आला असला तरी राज्यात त्याने पाठ फिरवली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. येत्या 23 जूनपासून मोसमी वारे महाराष्ट्र राज्यासह मध्य भारतात सक्रिय होईल, अशी शक्यता शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पावसाने पाठ फिरवली असल्याने आता खरिपाच्या पेरणीसाठी आणखी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी घाई करू नये, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जर पाऊस वेळेत पडला नाही तर भातशेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

सर्वात मोठी बातमी! शरद पवार यांना धमकी देणारे सौरभ पिंपळकर पहिल्यांदाच माध्यमांसमोर, म्हणाले…

Spread the love
Exit mobile version