Balu Dhanorkar | अन् त्यावेळी निवडून येऊन बाळू धानोरकरांनी काँग्रेसची लाज राखली; जाणून घ्या त्यांची राजकीय कारकीर्द…

Balu Dhanorkar | And Balu Dhanorkar, by being elected at that time, kept the shame of the Congress; Know his political career…

चंद्रपूरचे (Chandrapur) खासदार बाळू धानोरकर यांचे आज पहाटे आजारपणामुळे निधन झाले. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते. जाणून घेऊयात त्यांचा राजकीय जीवनप्रवास… (Balu Dhanorkar passed away)

IPL 2023 Winner | आयपीएलचा अंतिम सामना पार पडला! चेन्नई सुपर किंग्जकडे पाचव्यांदा विजेतेपद…

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित विजय मिळवून बाळू धानोरकर यांनी अवघ्या महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का दिला होता. चंद्रपूरच्या लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव करून बाळू धानोरकर यांनी विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली होती.

बाळू धानोरकर हे चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार आहेत. ४ मे १९७५ रोजी त्यांचा जन्म यवतमाळमध्ये झाला. कला आणि कृषी शाखेचे शिक्षण घेतल्यानंतर बाळू धानोरकर यांनी सुरुवातीच्या काळात काही व्यवसाय सुरू केले. यामध्ये कापड दुकान, वाहन खरेदीसाठी कर्जपुरवठा करणारी कंपनी व बार यांचा समावेश होता.

Marriage | इथं एकीचेच असतात वांदे! पण ‘हा’ गडी संभाळतो ९ बायका

राजकीय प्रवासात बाळू धानोरकर आधी चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेसकडून लोकसभेसाठीचे तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदार पदाचासुद्धा राजीनामा दिला होता. त्या लोकसभा निवडणुकीत ते चंद्रपूरच्या मतदारसंघातून विजयी झाले होते.

मोठी बातमी! चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

ऐनवेळी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या बाळू धानोरकर यांनी २०१९ ची लोकसभा जिंकून अक्षरशः काँग्रेसची लाज राखली होती. “भाजप ही आमचीच पैदाईश आहे. ज्या पद्धतीने अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प हद्दपार झाले आहेत. त्याप्रमाणे मोदींना भारतातून हाकलल्याशिवाय मी राहणार नाही “, असे बाळू धानोरकर म्हणत असत.

Romantic Viral video | अन् त्यांनी बुलेट वरच सुरू केला रोमान्स! व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घडवली अद्दल

झटपट काम करणारा, स्पष्टवक्ता व आक्रमक नेता म्हणून बाळू धानोरकर यांची राजकीय वर्तुळात ओळख होती. ‘ मी कधीच पुन्हा निवडून येण्यासाठी कामे करत नाही आणि लोकांना खोटी आश्वासने देत नाही. माझ्याकडून काम होणार नसेल तर मी लोकांना तसे स्पष्टपणे सांगतो.’ अशा विचारांचे बाळू धानोरकर होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *