मुंबई : पीएफआय (PFI) संघटनेला केंद्र सरकारने बेकायदेशीर संघटना घोषित केलं आहे. पुढच्या पाच वर्षांसाठी हा निर्णय लागू असेल असे केंद्राने म्हंटले आहे.पीएफआयची स्थापना करणारे काही सदस्य हे स्टूडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (Students Islamic Movement of India) म्हणजेच सीमीचे सदस्य असल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाने माहिती दिली आहे. या संघटनेची बांगलादेश संघटनेशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या या दोन्हीही दहशतवादी संघटना आहेत. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पीएफआयच्या माध्यमातून देशामध्ये दुष्प्रचार सुरू होता. या संघटनेच्या निशाण्यावर काही लोक असून यांना देशात हल्ला करायचा होता. अशी फडणवीसांनी दिली आहे. त्याचबरोबर पीएफआय ‘सायलेंट किलर’ असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत.
Eknath Shinde: ‘पीएफआय’वर भारतात बंदी! एकनाथ शिंदेनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“पीएफआयविरोधात अनेक पुरावे देखील उपलब्ध आहेत. बँकांमध्ये खाती उघडायची आणि कोणाला संशय येऊ नये म्ह्णून थोडेफार पैसे टाकायचे”, असा प्रकार या संघटनेकडून करण्यात येत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान एकनाथ शिंदेनी देखील यावर प्रतिक्रिया देईल आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, “केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर पाच वर्षांकरिता बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र सरकार स्वागत करित आहे.”
Eknath Shinde: शिवभोजन थाळी योजना बंद करण्याचा निर्णय अद्याप नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे