![Ban on sale of alcohol in the background of Shaurya Day! Bhima prepared at Koregaon](http://elokhit.com/wp-content/uploads/2022/12/Drink.jpg)
भीमा कोरेगाव येथे होणाऱ्या विजयस्तंभ शौर्य दिनाच्या कार्यक्रमाची जंगी तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव येथे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या कालावधीत मद्यविक्री वर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या काळात मद्यविक्रीची दुकाने बंद असणार आहेत. या बंदीचे उल्लंघन केल्यास कायदेशीर करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मोठी मागणी
भीमा कोरेगाव ( Bhima Koregaon) येथे विजयस्तंभ शौर्य दिनाच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. कोविडमुळे खंड पडल्यानंतर पहिल्यांदाच यावर्षी विजयस्तंभ शौर्य दिन ( Vijay sthambh shaury Din) यावर्षी साजरा केला जातोय. यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता जवळपास 16 ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पुणे शहरातील विविध परिसरातून 390 पीएमपीएमएल बसेसची सोय देखील करण्यात आली आहे.
शिक्षक की राक्षस! चौथीच्या विद्यार्थ्याला पहिल्या मजल्यावरून दिलं खाली फेकून
यामुळे कार्यक्रमास येणाऱ्या अनुयायांच्या प्रवासाची उत्तम सोय होणार आहे. यासोबतच तात्पुरती 400 स्वच्छतागृहे, 20 रुग्णवाहिका, आरोग्य पथके, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, अग्निशमन वाहनं ही प्राथमिक व्यवस्था देखील करण्यात आली आहे. “कार्यक्रमाला येणाऱ्या अनुयायांना कोणतीही समस्या येणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि नियोजित वेळेत आवश्यक काम पूर्ण करावे,” असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
ब्रेकिंग: मुंबई हायकोर्टाचा गायरान जमीन अतिक्रमणाबाबत मोठा निर्णय