केळी ( Banana) हे सर्वसामान्यांचे आवडते फळ म्हणून ओळखले जाते. बऱ्याचदा आपण आवडीने खाण्यासाठी केळी आणतो, मात्र या केळी फार दिवस टिकतच नाहीत. सफरचंद व इतर फळे फ्रीज मध्ये ठेवली की टिकतात पण केळी मात्र फ्रीजमध्ये ठेवली तरी काळी पडते. असं का होत असेल ? हा प्रश्न तुम्हाला पडलाय का! चला तर मग जाणून घेऊयात फ्रीज मध्ये ठेवलेली केळी काळी का पडते.
यंदा बारावीचा निकाल उशिरा लागणार? शिक्षकांनी टाकला उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार
खरंतर सफरचंदासारखी ( Apple) फळे मुळातच थंड हवामानात उगवणारी आहेत. त्यांना उष्ण हवामानात ठेवली की ती खराब होतात. यासाठी ती फ्रिजमध्ये थंड हवामानात ठेवली जातात. त्या वातावरणाचा त्यांच्यावर कोणताही गंभीर परिणाम होत नाही. मात्र केळी हे उष्ण कटिबंधात येणारे फळ आहे. उष्ण वातावरणातच त्याची वाढ होते. यामुळे थंडीचा केळीवर वाईट परिणाम होतो.
थंड वातावरणाला तोंड द्यायची क्षमता नसल्याने हळूहळू केळी काळी पडू लागते. केळी थंड वातावरणात ठेवली की तिच्या अंतरंगातील पेशींची रचना बदलायला लागते. त्यात सेल मेम्ब्रेन ( Cell Membrane) फाटून सगळीकडे रसमिसल होते. यामुळे केळीतील पेशींचा नाश होऊन केळी नासायला लागते आणि परिणामतः केळीच्या सालीवर काळे डाग पडतात.