मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीमध्ये नाराज असून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ माजली आहे. खुद्द अजितदादांनी देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मात्र, तरीही चर्चा काही थांबता थांबत नाहीत.
मोठी बातमी! गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यात दोन तास चर्चा; राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण
आता या सर्व चर्चा सुरू असतानाच पुण्यात काही बॅनर झळकले आहेत. अजितदादा हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स पुण्यात झळकले आहेत. पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. हे बॅनर पुण्यातील कोथरूडमध्ये झळकले आहेत. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. आता अजित पवार खरच भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न लोकांना पडला आहे.
अजित पवार यांनी काल एक मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी “२०२४ मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याची गरज कशाला, मी आता देखील दावा सांगू शकतो. २०२४ ची कशाला वाट पाहू, असं म्हणत अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाबद्दल मनातलं बोलून दाखवलं.” आणि त्यानंतर संध्याकाळी अचानक कोथरूडमध्ये अजितदादांचे बॅनर्स लागले आहेत. त्यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे.