
मुंबई : एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) ४० आमदार आणि १२ खासदारांसोबत बंद केल्यामुळे ठाकरे सरकार कोसळले. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सक्रिय होऊन राज्यभर दौरे करत आहेत. राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. एकनाथ शिंदे गटाने आपला मोर्चा काँग्रेसकडे वळवल्याचे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता या सर्व पार्शवभूमीवर एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) बंडखोरांवर टीका केली आहे.
बंडखोरी केलेल्या आमदारांवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. बंडखोरीसाठी या आमदारांना प्रत्येकाला ५० कोटी रुपये देण्यात आले असा दावा महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी केला होता. याच दाव्याला धरून एकनाथ खडसेंनी बंडखोरांवर निशाणा साधला आहे.
ज्यांच्या बापजाद्याने कधीच ५० खोके पाहिले नसतील. तुम्हाला काय झाडी, हाटील पाहायचं ते पाहा, पण सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडू नका असा टोला एकनाथ खडसेंनी लागावला आहे. “अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून गेल्या ३७ दिवसापासून पोरखेळपणा सुरु आहे. अशी बोचरी टीका एकनाथ खडसेंनी केली.