मुंबई : कोरोना महामारीनंतर म्हणजेच तब्बल दोन वर्षांनंतर ना नियम ना अटी अशा वातावरणात यावेळी बाप्पा गणेशाचं आगमन झाले आहे.बाप्पाचे आगमन झाल्याने सर्वत्र उत्साह आणि आनंद बघायला मिळतोयं. सर्वांनाच गेल्या अनेक दिवसांपासून बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट होती. शेवटी तो क्षण आलांय आणि सर्वांचाच घरी (Home) आता बाप्पा विराजमान होताना दिसत आहेत.
Shahajibapu Patil: “घरात जर राजकारण शिरलं तर घोटाळा होतोच होतो”,घराणेशाहीवर शहाजी बापूंची टोलेबाजी
सर्वसामान्यांपासून तर राजकीय आणि सिनेसृष्टीतील लोकांनी आपल्या घरात बाप्पा गणेशाचं स्वागत केले आहे. दरम्यान मराठी अभिनेता अभिनेता स्वप्नील जोशीच्या (Swapnil Joshi) मुंबईतील घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. स्वप्नील जोशीने पारंपारिक मूर्तीची घरी स्थापना करून सजावट देखील साधी केलीयं. त्यामुळे सजावटीतील साधेपणा आणि पारंपरिक मूर्ती हेच स्वप्नीलच्या बाप्पाची वैशिष्य बघायला मिळते.
तसेच बाप्पाची साधी सजावट यात दिसणारे बाप्पाचे मोहक रूप मला भावते, असे स्वप्नील म्हणाले आहेत.बाप्पाच्या आगमनावेळी स्वप्नीलने चांगले आरोग्य लाभो, सुख समाधान घरी नांदो ही प्रार्थना केलीयं. स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाच्या आगमनावेळी संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.
बाप्पाच्या मूर्तीच वैशिष्टय
स्वप्नील जोशींच्या घरी गेल्या आठ ते दहा वर्षांपासून पंचधातूची मूर्ती बाप्पाची मुर्ती विराजमान होते. इतकेच नाही तर स्वप्नीलने सजावटबद्दल देखील माहिती प्रेक्षकांना सांगितलीयं. साधे आणि शोभर सजावट करण्यावर स्वप्नीलचा भर असल्याचे सजावट पाहून दिसून येते अस स्वप्नील जोशीं म्हणाला.