
मुंबई : यंदा गणपती बाप्पा शेतकऱ्यांना चांगलाच पावला आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला सोन्यासारखा भाव मिळाला आहे . यंदा खरेदीच्या मुहूर्तावरच धरणगावच्या जिनिंगमध्ये कापसाला ११ हजार १५३ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. जागतिक बाजारपेठेत महापुराच्या फटक्यामुळे उत्पादन घटल्याने कापसाला हा सोण्यासरखा भाव प्राप्त आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर बाप्पाची कृपादृष्टी झाल्याने उत्पादन घटल्याने जगात मागणी वाढली आहे.
Subodh Bhave: पुणे मेट्रो संदर्भात केलेली सुबोध भावेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
आणखी या पाठीमागचे दुसरे कारण म्हणजे गेल्या वर्षी पाकिस्तान, बांगलादेश व चीनमध्ये महापूर आल्याने कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे भारतीय कापसाची मागणी मोठ्या प्रमाणात होती. विशेष म्हणजे गेल्या वर्षी खुल्या बाजारात ११ हजारांचा उच्चांकी भाव मिळाला होता. यंदाही तीच परिस्थिती कायम असल्याने कापसाला मोठी मागणी आहे. त्यामुळे पुढेही कापसाला मागणी वाढेल असा अंदाज बांधल्या जात आहे.
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात कापसाचा पेरा वाढल्याने गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा कापसाचा उत्पादही वाढले आहे. त्यामुळे त्याचा फायदाही शेतकऱ्यांना होईल. गेल्या वर्षी जिल्ह्यात चार लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी करण्यात आली होती. यंदा त्यात जवळपास ७५ हजारांनी वाढ होऊन ती पाच लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे.
Akal Takht: यापुढे असे धर्मांतर खपवून घेतले जाणार नाही; पंजाबमधील अकाल तख्तचा इशारा