बापरे! 24 कोटींचा रेडा, सलमान खानसह अनेक सेलिब्रेटींनी लगावली बोली

Bheema

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात असणाऱ्या सारंगखेड्याचा (Sarangkheda) घोडेबाजार (Horse market) खूप प्रसिद्ध असून येथे देशभरातील जातीवंत घोडे येत असतात. हे घोडे आपल्याकडेही असावेत यासाठी अश्वप्रेमी मंडळी कोट्यवधी रुपयांची बोली लावतात. परंतु सध्या सर्वत्र रेड्याची चर्चा सुरु असून त्याला बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्यासह अनेक सेलिब्रेटींनी बोली लगावली आहे. कोट्यवधी रुपयांच्या या रेड्यामध्ये असे काय खास आहे? जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत! बुलढाण्यात केला अनोखा प्रयोग

सारंगखेड बाजारासारखाच राजस्थान (Rajasthan) येथील जोधपूरमध्ये शेतकरी मेळावा भरतो. परंतु यावर्षी या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण ठरला आहे भीमा नावाचा मुर्राह जातीचा रेडा (Bheema Buffelo). हा रेडा नावाप्रमाणेच इतका अवाढव्य आहे की तो पाहण्यासाठी गर्दी होत आहे. याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर या रेड्याची किंमत एकूण 24 कोटी रुपये इतकी आहे.

‘या’ पॅनकार्डधारकांना होणार फायदा! आयकर विभागाने दिला मोठा दिलासा

अरविंद प्रजापत (Arvind Prajapat) यांचा भीमा नावाचा हा रेडा असून त्याचे वय आठ वर्ष वय इतके आहे. त्याच्या देखभालीसाठी 3 ते 4 जणांची टीम आहे. त्याच्या फक्त जेवणावर दररोज चार ते पाच हजार रुपयांचा खर्च होतो. त्याला अंडी, दूध, लोणी तसेच सुका मेवा फळे आणि हंगामानुसार चारा देण्यात येतो. त्याची उंची 6 फूट आणि लांबी सुमारे 14 फूट इतकी आहे.

पहाटेच्या शपथविधीबद्दल माहित होतं का? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” तेव्हा मला… “

हे ही पहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *