बापरे! चक्क म्हशींनी फोडलं वंदे भारत एक्सप्रेसचं नाक, 147 कलमानुसार मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल

Bapre! A buffalo broke the nose of Vande Bharat Express, a case has been filed against the owner under Section 147

मुंबई : गुरुवारी सकाळी मुंबईहून अहमदाबादकडे (Ahmedabad) जाणाऱ्या वंदे भारत सेमी हाय स्पीड एक्सप्रेसला अपघात झाला. या अपघातात इंजिनाच्या मडगाडचा समोरील अर्धा भाग फुटला. याच वंदे भारत एक्सप्रेसचं (Vande Bharat Express ) 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm modi) यांच्या हस्ते लोकार्पण झालं होतं. ही ट्रेन ताशी 180 ते 200 किमी एवढ्या वेगाने धावते. घटना अशी घडली की, वटवा आणि मणिनगर स्टेशनदरम्यान काही म्हशींनी (buffaloes) ट्रेनला धडक (hit) दिली. दरम्यान या धडकेत ट्रेनच्या इंजिनाचा (Engine) काही भाग फुटला.

Yogi Adityanath: मुख्यमंत्री योगींनी अयोध्येतील राम मंदिराबाबत दिली महत्वाची माहिती

खरतर रेल्वेपटरी आणि स्टेशनच्या परिसरात जनावरांना आणण्यास मनाई असते. तरीदेखील स्टेशनजवळ म्हशी आणण्यात आल्या. दरम्यान या म्हशी थेट ट्रेनवर येऊ धडकल्या. यात चार म्हशी जागीच ठार झाल्या. दरम्यान आता रेल्वे सुरक्षा दल अर्थात आरपीएफने म्हशींच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धनुष्यबाण चिन्ह नेमक कोणाचं? फैसला पडला लांबणीवर

रेल्वे पोलिसांना म्हशींच्या मालकाचा शोध अद्याप लागलेला नाही. रेल्वे अधिनियम 1989 मधील 147 कलमानुसार, एफआयआर दाखल करण्यात आलंय. रेल्वेच्या कोणत्याही भागात अनधिकृत प्रवेश आणि रेल्वेच्या संपत्तीचा दुरुपयोग करण्यासंबंधी हे कलम असल्याची माहिती वटवा रेल्वे स्टेशनवरील आरपीएफ इन्सपेक्टर प्रदीप शर्मा यांनी दिली.

चक्क कला शाखेच्या विद्यार्थ्याने बनवला शेतीच्या फवारणीसाठी ड्रोन, 10 मिनिटात एक एकरावर करणार फवारणी

अहमदाबाद रेल्वे पीआरओ यांनी सांगितलं की, ही घटना सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत इंजिनाचा काही भाग तुटून पडला आहे. त्यामुळे तो परत दुरूस्त करण्यासाठी 20 मिनिटं लागले. महत्वाची बाब म्हणजे म्हशींच्या धक्क्याने ट्रेन कशी फुटू शकते, असा प्रश्न काल उपस्थित केला गेला. परंतु हा भाग कॉस्मेटिक असल्याने तो पूर्णपणे बदलून नवा लावण्यात आला.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळी बोनस जाहीर होण्याची शक्यता

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *