मुंबई : आत्ता सध्या पावसाळा ऋतू चालू आहे. त्यामुळे काही ठिकाणी जास्त पाऊस पडला तर काही ठिकाणी जास्त पाऊस पडला.आणि ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडला तिथे पूरस्थिती निर्माण झाली. या पुर परिस्थितीमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले.तसेच यासोबत शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage to crops) झाले आहे.
Eknath Shinde: पोलीस, अग्नीवर भरतीसाठी तरुणांना आवश्यक सुविधा पुरवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश
या पूर परिस्थितीमुळे भाजीपाल्याच्या दरांनी आभाळच गाठल की काय आस म्हणावं लागेल. सध्या पाकिस्तानात आलेल्या पुराच्या कहरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. श्रीलंकेनंतर आणखी एक शेजारी देश पाकिस्तानला (Pakistan) महागाईचा सामना करावा लागत आहे. टोमॅटो (tomato) 500 रुपये किलो, कांदा (Onion) 400 रुपये किलो तर बटाटा 120 रुपये किलो.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पाकिस्तान सरकार भारतातून कांदा-टोमॅटो आयात करण्याचा विचार करत आहे. पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, वापराच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याचे बाजारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच किरकोळ बाजारात फळे आणि भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याआधी लाहोर, इस्लामाबादसह अनेक मोठ्या शहरांमध्ये भाज्या आणि फळांच्या किमतीत मोठी वाढ झाली होती.
ST Employee: एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्या! एकनाथ शिंदेंच्या परिवहन खात्याला सूचना
तसेच बलुचिस्तान, सिंध आणि दक्षिण पंजाबमधील पूरस्थितीमुळे भाजीपाला उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून येत्या काही दिवसांत भाजीपाल्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान हे वाढते बाजार पाहून घाऊक व्यापारी जवाद रिझवी म्हणाले की, टोमॅटो आणि कांद्याचे भाव येथे 700 रुपये किलोपर्यंत पोहोचतील. जीवनावश्यक भाज्यांमध्ये समाविष्ट असलेल्या बटाट्याचे दरही 40 रुपयांवरून 120 रुपये किलो झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे पूरस्थिती आणि घटते उत्पादन पाहता जर लवकरच ठोस पावले उचलली गेली नाहीत तर अजून भाव वाढतील. आणि लोकांना जीवनावश्यक वस्तूपासून वंचित राहावं लागलं.
ST Employee: एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्या! एकनाथ शिंदेंच्या परिवहन खात्याला सूचना