Site icon e लोकहित | Marathi News

Coriander: बापरे! कोथिंबीरीचे दर कडाडले! मिळतोय ‘इतका’ भाव

Bapre! Coriander prices are tight! Getting 'so much' price

नाशिक : मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी राजाचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. या पिकांमध्ये भाजीपाल्याचे देखील नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी काढणीच्या मापात आलेल्या भाजीपाल्याचे (vegetables) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक घटली व मागणी वाढली यामुळे भाजीपाल्याचे दर चांगलेच कडाडले आहेत.

Raj Thackeray: राज ठाकरेंचा एक निवेदनातून सूचक इशारा, म्हणाले -“…तर महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा शिकवतील”

भाजीपाल्याच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळतंय पण शेतकरी सध्या आनंदित आहेत. याचाच परिणाम गुरुवारी सायंकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य बाजार आवारात कोथींबीरीच्या (Coriander)न झालेल्या लिलावात पाहायला मिळालाय. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Nashik Agricultural Produce Market Committee) एका शेतकऱ्याच्या कोथिंबिरीला 16 हजार रुपये प्रति शेकडा एवढा बाजारभाव मिळाला आहे.

Pakistan: पाकिस्तान कर्णधार बाबर आझमचा रिझवानसोबत विश्वविक्रम, विराट कोहलीला टाकले मागे

दरम्यान बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी (heavy rain) झाल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांकडे शेतात कितपत भाजीपाला शिल्लक असेल हादेखील एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे वाढत्या बाजारभावाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. पण भाजीपाल्याचे दार कडाडल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला चांगलाच आर्थिक चटका बसत आहे.

लिंबू बहाराबाबत आवश्यक माहिती, वाचा एका क्लिकवर

Spread the love
Exit mobile version