मुंबई : आजकालच्या तरुणांमध्ये फास्ट फूड खाण्याचे प्रमाण जास्तच वाढत चालेले आहे. सध्या पिझ्झा (Pizza) या फास्टफुडचं तरूणांमध्ये विशेष प्रेम दिसून येते. पण याच पिझ्झ्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील एका ग्राहकाने डॉमिनोज पिझ्झा (Domino’s Pizza) मागवला पण पिझ्झा खात असतानाच त्याला काचेचे तुकडे आढळून आलेत. सोशल मीडियावर त्याने याबाबत एक पोस्ट देखील केली आहे. त्याची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
Urfi Javed: हाय गर्मी! उर्फी जावेदन वाढवलं इंटरनेटचं तापमान; पाहा VIDEO
अरूण कोल्लुरी (Arun Kolluri) या व्यक्तीने डॉमिनोजच्या पिझ्झा ऑर्डर केला होता. पिझ्झा खात असताना त्याला जवळपास दोन ते तीन मोठे काचेचे तुकडे आढळले. यावेळी त्याने लगेचच याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.
2 to 3 pieces of glass found in @dominos_india This speaks volume about global brand food that we are getting @dominos @jagograhakjago @fssaiindia Not sure of ordering ever from Domino's @MumbaiPolice @timesofindia pic.twitter.com/Ir1r05pDQk
— AK (@kolluri_arun) October 8, 2022
त्याने पोस्ट शेअर करत ‘जागो ग्राहक जागो’ यांना देखील टॅगही केलं आहे. या पोस्टनंतर पिझ्झा खाणाऱ्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. ज्या व्यक्तीसोबत ही घटना घडली त्याने मुंबई पोलिसात तक्रार देखील केली आहे. कायदेशीर काही उपाय शोधण्या आधी डॉमिनोजच्या कस्टमर केअरशी संपर्क साधावा असा सल्ला देखील मुंबई पोलिसांनी त्यांना दिला आहे.
काळया रंगाच्या ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो का? तज्ञांकडून जाणून घेऊयात सत्य