Site icon e लोकहित | Marathi News

बापरे! भर रस्त्यामध्ये ‘या’ व्यक्तीने केला उर्फी जावेद हिला प्रपोज

Bapre! On the road, this person proposed to Urfi Javed

प्रसिद्ध अभिनेत्री आणि माॅडेल उर्फी जावेद (Urfi Javed) सतत चर्चेत असते. उर्फी अनेकादा तिच्या कपड्यांमुळे चर्चेत येते. कपड्यांमुळे उर्फीला अनेकादा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. उर्फी तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. उर्फी सोशल मीडियावर (social media)प्रचंड सक्रिय असते.

“भाजपच्या तमाशातला नाच्या”, नितेश राणे यांच्यावर ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याने केली खरमरीत टीका

उर्फी तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते. कोण काय म्हणेल याचा विचार उर्फी कधीच करत नाही. ती एक बिंधास्त अभिनेत्री आहे. सध्या सोशल मीडियावर उर्फीचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चक्क उर्फीला एका चाहत्याने प्रपोज केलं आहे.

ब्रेकिंग! शिंदे गटाच्या दोन आमदारांचा अपघात! डंपरने दिलेल्या धडकेत कारचा चक्काचूर

या व्हिडिओमध्ये उर्फी एका हाॅटेलच्या बाहेर दिसत आहे. जिथे पापाराझी यांनी तिच्या भोवती गर्दी केली आहे. ती गर्दी पाहूण उर्फी म्हणाते, तुम्ही फार कमी लोक आहात. पण यावेळी गंमतीशीर किस्सा घडतो. या गर्दीतून पळत येत एक चाहता उर्फीला आय लव यू म्हणतो. यावेळी उर्फी देखील हसत हसत डोळा मारताना दिसत आहे. त्यामुळे सध्या या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे.

शुभमन-साराचा ब्रेकअप? गिलचा ‘तो’ व्हिडीओ पुन्हा एकदा होतोय व्हायरल

Spread the love
Exit mobile version