रविवारी रात्री बेडग (Bedag) (ता. मिरज) येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात गौतमी पाटील (Gautami Patil )हिच्या लावणी नृत्याचा (Lavani dance) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या लावणीच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शाळेच्या छतावर चढून कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांनी (audience) शाळेच्या कौलांचा चुराडा केला. दरम्यान या गर्दीत तुडवले गेल्याने दत्तात्रय विलास ओमासे (वय ४४, मूळगाव यड्राव, इचलकरंजी, सध्या रा.बेडग) यांच्या डोक्याला मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नेमकी घटना काय घडली ?
रविवारी बेडग येथे गजराज कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे सत्कार समारंभ होणार होता. दरम्यान या सत्कार समारंभावेळी सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या लावणी नृत्याचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी पालकमंत्री सुरेश खाडे देखील उपस्थित होते. गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर नृत्य पाहण्यासाठी जिल्ह्यातून व बाहेरून मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी गर्दी (Crowded with spectators) केली होती.
आज मंत्रिमंडळात होणार मोठा निर्णय, पोलिसांसह शासकीय मेगाभरतीसाठी वाढणार वयोमर्यादा
दरम्यान यावेळी शाळेच्या पटांगणात प्रचंड गर्दी झाल्याने काही प्रेक्षकांनी शाळेच्या कौलारू छतावर गर्दी केली. कौलारू छतावर नृत्याचा ताल धरत प्रेक्षकांनी कौलांचा चुराडा केला. आयोजकांनी सूचना देऊनही प्रेक्षक ऐकत नव्हते. दरम्यान यावेळी एका झाडावर देखील प्रेक्षक बसले होते. दरम्यान ते झाडही कोसळले आणि अचानक मैदानावर प्रचंड गर्दी उसळली. तरीदेखील अनेकजण नाचू लागले आणि त्यावेळी चेंगराचेंगरी झाली. दरम्यान त्या गर्दीत तुडवले गेल्याने दत्तात्रय ओमासे यांचा डोक्याला मार लागून मृत्यू झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
“..अरे, ही तर पापा की परी”, तरुणीची उभ्या ट्रकला स्कूटीची जोरदार धडक, व्हिडिओ व्हायरल