तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC) ही मालिका अनेकांची आवडती मालिका आहे. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील अनेक पात्रांचे GIF आणि मीम्स सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड वापरले जातात. या मालिकेतील पात्रांना लोकं भरभरून प्रेम देतात.
”उर्फी जावेद मुलगी नाही किन्नर”
दरम्यान, या मालिकेतील पोपटलाल म्हणजेच अभिनेता श्याम पाठक (Shyam Pathak) याच्या पात्राला देखील चाहते भरभरून प्रेम देतात. पोपटलालचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. या मालिकेमध्ये पोपटलालचे लग्न झाले नसले तरी खऱ्या आयुष्यात माञ पोपटलालचे लग्न झाले आहे. आता पोपटलाल त्याच्या संपत्ती मुळे चर्चेत आला आहे. श्याम पाठक ‘पोपटलाल’ ही भूमिका साकारण्यासाठी चांगल मानधन घेत असून त्याच्याकडे संपत्ती देखील मोठ्या प्रमाणात आहे.
शरद पवारांबद्दल बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली; म्हणाले…
मीडिया रिपोर्टनुसार , पोपटलाल म्हणजेच अभिनेता श्याम पाठक याच्याकडे जवळपास १५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ‘तारत मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील एका एपिसोडसाठी अभिनेता जवळपास ६० हजार रुपये मानधन घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर तो फक्त मलिकेमधूनच नाहीतर जाहिरात आणि इतर कार्यक्रमांमधून देखील बक्कळ पैसा कमावतो.
अमोल मिटकरी यांचा गोपीचंद पडळकरांवर हल्लाबोल
पोपटलाल मालिकेमध्ये जरी त्याच्यासाठी जोडीदार शोधत असला तरी त्याचे खऱ्या आयुष्यात लग्न झालेले आहे . त्याचबरोबर त्याला 3 मुल देखील आहेत. पोपटलाल 46 वर्षांचा असुन त्याच्या पत्नीचं नाव रश्मी पाठक असं आहे. त्याचं कुटुंब झगमगत्या विश्वापासून दूर आहे.