
दिवसेंदिवस फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. वेगवेगळे फंडे वापरून लोकांना लुटण्याच्या घटना आजकाल मोठ्या प्रमाणात घडतात. मागच्या काही दिवसांत दूधवाला ( Milkman crime) बनून महिलांची लूट करणारी एक टोळीच पश्चिम महाराष्ट्रात पसरली होती. तुमच्या दुधवाल्याचा पाहुणा आहे किंवा त्याची दुसरी ओळख सांगून शहरी भागात मोठ्या-मोठ्या बंगल्यातील व सोसायट्यांमधील महिलांच्या गळ्यातील दागिने या टोळीने लुटले आहेत. मात्र नुकतेच शहर गुन्हे शाखेने या टोळीला जेरबंद केले आहे. इतकंच नाही तर त्यांच्याकडून साडे सहा लाखांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे.
‘या’ ठिकाणाहून निघणार महाविकास आघाडीचा महामोर्चा
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव गंगावणे, कंट्या गंगावणे व अनिल बिरदवडे या तिघांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली असून हे तिघेही बारामती येथील बांदलवाडी येथे राहणारे आहेत. या तिघांच्या नावे पुणे शहर, पुणे ग्रामीण, भोर, शिरूर, सातारा येथील पोलिसांत 14 गुन्ह्यांची नोंद आहे. हे तिघेही फक्त दुसरी शिकलेले आहेत परंतु, चोरी करताना त्यांनी डोके लावून अजब फंडा वापरला होता. यामुळे पोलिसांची डोकेदुखी यांनी वाढवली होती.
महापुरुषांबद्दल वाईट बोलणाऱ्याला रट्टा दिला पाहिजे – बच्चू कडू
मात्र, पोलिसांनी गुन्हे नोंद असलेल्या शहरातील CCTV फुटेज मिळवून दुचाकीवरून जाणाऱ्या चोरट्यांचा शोध घेतला. यासाठी त्यांनी जवळपास 100 ठिकाणचे CCTV फुटेज तपासले. या अथक प्रयत्नांनंतर पोलीसांना अखेर यश आले आणि ही चोरट्यांची टोळी जेरबंद झाली.
महापुरुषांबद्दल वाईट बोलणाऱ्याला रट्टा दिला पाहिजे – बच्चू कडू