Baramati Loksabha । बारामतीच्या राजकारणात मोठी खळबळ! अपक्ष उमेदवाराला मिळालं तुतारी चिन्ह; सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगात धाव

Supriya Sule

Baramati Loksabha । महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महाराष्ट्रात पाच टप्यात निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Chandra Pawar Party) नेते शरद पवार दौरे करत आहेत. मात्र सध्या बारामती लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

Ajit Pawar । अजित पवारांबाबत बड्या नेत्याचं धक्कादायक विधान; म्हणाले…

काल बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात आली. यावेळी सुप्रिया सुळे यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. त्याचबरोबर दुसऱ्या एका उमेदवाराला देखील ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यावरून आता शरद पवार पक्षाने नाराजी व्यक्त करत थेट निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.

Eknath Shinde । सर्वात मोठी बातमी! भाजपच्या नव्या प्रस्तावाने एकनाथ शिंदेंना बसणार फटका

सोयल शेख या अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. यावरून सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस आहे, मात्र असं असताना देखील निवडणूक आयोगाने सोहेल शेख या अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिलं गेलं आहे, यामुळे मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

Baramati Loksabha l धक्कादायक बातमी! बारामतीमध्ये आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह

Spread the love