Baramati Loksabha l सध्या सगळीकडे लोकसभेची धामधूम पाहायला मिळत आहे. काल लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता कुणाचा सामना कुणाविरुद्ध होणार याचं चित्र देखील स्पष्ट झालं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ मागच्या काही दिवसापासून चर्चेत आहे कारण या ठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील नवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सध्या तुतारी चिन्हांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
chhota rajan news । ब्रेकिंग! दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू अजून जिवंत; ९ वर्षांनी फोटो आले समोर
बारामती लोकसभेच्या जागेसाठी सोहेल शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या उमेदवाराला ट्रम्पेट म्हणजेच तुतारी हे चिन्ह मिळालं आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मात्र या चिन्हाच्या नावाला सुप्रिया सुळेंनी हरकत घेतली आहे. त्यांनी याबाबत पत्र देखील निवडणूक आयोगाला पाठवले आहे.
Sharad Pawar । पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आकडेवारीवर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य!
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस आहे, मात्र असं असताना देखील निवडणूक आयोगाने सोहेल शेख या अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिलं गेलं आहे, यामुळे मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यामुळे हा गोंधळ टाळण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.