पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणारे बारामती शहर दिवसेंदिवस विकसित होत आहे. औद्योगिक, कृषी व शैक्षणिक क्षेत्रात या शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. या विकासाला आणखी चालना मिळावी यासाठी बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफ्रॅक्चर्स असोसिएशनने मुंबईसाठी रेल्वे सेवेची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आपण रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करू असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी दिले आहे.
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ! एकनाथ खडसे नॉटरिचेबल
बारामती शहरात उद्योग, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने लोक दररोज ये-जा करतात. इतकंच नाही तर बारामती एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात तीस हजारहून अधिक कामगार काम करत आहेत. दरम्यान बारामती ते मुंबई व मुंबई ते बारामती प्रवास करणाऱ्या उद्योजक, व्यवसायिक व कर्मचाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यांच्यासाठी सध्या फक्त एसटी बस उपलब्ध आहे. ( Baramati – Mumbai – Baramati Railway)
भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीवर निवड!
यामुळे या लोकांना बऱ्याचदा नाईलाजाने खासगी वाहन वापरून खर्चिक व असुरक्षित प्रवास करावा लागतो. बारामती वरून पुण्याहून मुंबईकडे दररोज सकाळी पहाटे पाचला रेल्वे गाडी सोडल्यास ती सात वाजेपर्यंत पुण्यात पोहचेल व नंतर मुंबईकडे रवाना होईल. याशिवाय हीच गाडी संध्याकाळी मुंबईहून परतताना रात्री मुक्कामी राहिल्यास अनेक प्रवाशांना फायदा होणार आहे. असे बारामती – मुंबई रेल्वे प्रस्तावात मांडण्यात आले आहे.
राज ठाकरेंना आज कोर्टात हजर रहावे लागणार; अजामीनपात्र वॉरंट जारी!