Baramati News । बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमीजवळ रात्री 11 वाजता एका 23 वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. गेल्या सहा महिन्यांत ही तिसरी हत्या आहे, ज्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. अनिकेत सदाशिव गजाकस असे मृत तरुणाचे नाव असून, आरोपींनी फक्त एका मुलीशी बोलल्याच्या कारणावरून त्याचा जीव घेतला.
Eknath Shinde । ब्रेकिंग! शिंदे गटातील बडा नेता करणार बंडखोरी? धनुष्यबाण हटवला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत हा आरोपींच्या मावस बहिणीशी कॉलेज परिसरात बोलत होता. यावरून आरोपींना राग आला आणि त्यांनी अनिकेतवर कोयत्याने सपासप वार केले. हा हल्ला प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी रस्त्यावर रात्री साडेदहा ते अकरा वाजता घडला. हल्ल्यात अनिकेत गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली आणि त्याने रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.
या घटनेनंतर अनिकेतचा भाऊ अभिषेक गजाकस यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, नंदकिशोर अंभोरे, महेश खंडाळे आणि संग्राम खंडाळे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.