
Baramati News | बारामती विधानसभा निवडणुकीच्या आगोदर सोमवारी रात्री बारामतीतील शरयू मोटर्स शोरुममध्ये पोलिसांनी एक मोठी शोध मोहीम राबवली. युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांचे शोरुम असलेल्या या ठिकाणी पोलिसांनी तपासणी केली, मात्र त्यात कोणतीही अवैध रक्कम किंवा संशयास्पद गोष्टी आढळून आले नाहीत. पोलिसांच्या या अचानक सर्च ऑपरेशनमुळे बारामतीत मोठी चर्चा सुरू झाली आहे. युगेंद्र पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना पूर्णपणे सहकार्य केल्याचे सांगितले.
Sharad Pawar l रोहित पवारांना देणार मोठी जबाबदारी; शरद पवारांनी भरसभेत जाहीर केलं
युगेंद्र पवार यांनी या घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, त्यांनी पोलिसांना शंभर टक्के सहकार्य केले असून, शोरुममध्ये काहीही संशयास्पद गोष्टी आढळले नाहीत. “शरद पवार यांच्या सभेला आलेली गर्दी पाहून काही लोकांची घाबरगुंडी होणे स्वाभाविक आहे, पण अशी घटनांमध्ये राजकारणाचा समावेश करणे दुर्दैवी आहे,” असे युगेंद्र पवार म्हणाले.
ते म्हणाले, “आम्ही निवडणुकीच्या काळात कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्व काही करत आहोत.” युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आहेत आणि बारामतीत अजित पवार यांना आव्हान देत आहेत.
पोलिसांच्या सर्च ऑपरेशनवर बारामती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, निवडणुकीच्या काळात विविध ठिकाणी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यानुसार तपासणी केली गेली. तथापि, शोरुममध्ये कोणतीही अनधिकृत रक्कम किंवा साहित्य मिळून आले नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
Politics News । मतदानाच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटाकडून मोठा धक्का!