Baramati News । ‘सरकारचा भरलाय घडा अजित दादा सरकारमधून बाहेर पडा’; बारामतीमध्ये मराठा आंदोलकांच्या तुफान घोषणा

'Sarkarcha bhalai ghada Ajit Dada quit the government'; Maratha protestors storm slogans in Baramati

Baramati News । बारामती : जालना जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर संपूर्ण राज्यातील मराठा समाज आक्रमक झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान आज बारामतीत देखील कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आज बारामती या ठिकाणी मराठा मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून आंदोलकांनी यावेळी तुफान घोषणाबाजी केली आहे.

Maratha Reservation । मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार का? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

बारामती हा अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यामुळे या घोषणाबाजीतून आंदोलकांनी यावेळी अजित पवार यांना सरकार मधून बाहेर पडा अशी मागणी केली आहे. ‘सरकारचा भरलाय घडा अजित दादा सरकारमधून बाहेर पडा’ अशा घोषणा मोर्चेकरांनी दिल्या आहेत. या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Pune Accident News । भीषण अपघात! टेम्पो-कारची समोरासमोर धडक; ३ जण जागीच ठार

दरम्यान, जालन्यात झालेल्या घटनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सगळीकडे सुरू आहेत. या घटनेचा आज तिसरा दिवस असून अजित पवार यांनी त्यांचे सगळे कार्यक्रम राखीव ठेवले आहेत. मागच्या दोन दिवसापासून अजित पवारांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावलेली नाही. मात्र अजित पवार यांची तब्येत ठीक नसल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Drink Before Brushing Teeth । सकाळी ब्रश न करता पाणी पिणे कितपत फायदेशीर? जाणून घ्या एकाच क्लिकवर

Spread the love