Site icon e लोकहित | Marathi News

Baramati News । बारामतीच्या राजकारणातून समोर आली सर्वात मोठी बातमी!

Ajit Pawar

Baramati News । लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या पराभवामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसला होता. या पराभवाच्या तणावातून बाहेर येत, अजित पवार यांनी रविवारी बारामतीमध्ये आपल्या भावनांचे व्यक्तीकरण केले. बारामतीकरांना आता मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत.

Ganpati Bappa Morya । गणेश चतुर्थीच्या उत्सवात गणरायाचे घराघरांत दणक्यात स्वागत!

अजित पवार (Ajit Pawar) यांना ६५ वर्षे पूर्ण झाली असून, त्यांनी स्वतःला समाधानी असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना, “आपण लाखोंच्या मतांनी निवडून आलेल्या माणसांची तुलना करत आहोत. मी बारामतीकरांना माझ्या परिपूर्णतेचे उदाहरण ठेवायला हवे, म्हणून मी सोडून इतर उमेदवार मिळाला पाहिजे. मग तुम्ही त्यांच्या कार्याची तुलना माझ्या कार्याशी करू शकाल,” असे स्पष्ट केले.

Ajit Pawar । अजित पवार गटाला किती जागा हव्यात? छगन भुजबळांनी थेट आकडाच सांगितला

ते पुढे म्हणाले, “बारामतीकरांना न सांगता अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. रस्ते झाले, पिण्याच्या पाण्याची योजना तयार झाली, मेडिकल कॉलेज आणि आयुर्वेदिक कॉलेजची स्थापना झाली. बारामतीच्या बाहेर सध्या ७५० कोटींच्या कामांची अंमलबजावणी सुरू आहे.”

Devendr Fadanvis । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, “अजितदादांसोबतची युती नॅचरल नाही”

अजित पवार यांच्या या विधानामुळे बारामतीतले राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकीत बारामतीच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Spread the love
Exit mobile version