मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने (bjp)मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आणि बारामतीत (Baramati) भाजपाचाच विजय होणार, अशी घोषणा केली होती. या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Raktchandan: रक्तचंदनाला आंतरराषट्रीय बाजारात लाखोंची मागणी, रक्तचंदनाचा ‘हा’ आहे औषधी उपयोग
दरम्यान या विधानाला प्रतिउत्तर देताना अजित पवारांनी (ajit pawar) थेट सांगितल आहे की, बारामतीत कुणीही येऊ द्या. त्यांचं स्वागतच आहे. पण मतदानाच्या दिवशी कुठं बटण दाबायचं हे बारामतीकरांना (Baramati ) चांगलंच ठाऊक आहे. असे किती आले आणि किती गेले. तुम्ही बारामतीची काळजी करू नका, असं वक्तव्य देखील अजित पवारांनी केलं आहे.
Neeraj Chopra: नीरज चोप्राने पुन्हा रचला इतिहास, डायमंड ट्रॉफी जिंकणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
कावळ्याच्या शापाने जनावरं मरत नाही
पुढे अजित पवार म्हणाले की , ‘तुम्ही बारामतीची काळजी करू नका. कावळ्याच्या शापाने जनावरं मरत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. महत्वाचं म्हणजे माझ्यापेक्षा जास्त काम जर कुणी बारामतीत काम करत असेल तर त्याचा विचार करता येईल. पण काय आहे ना प्रत्येकजण नवीन अध्यक्ष झाल्यावर त्याला हुरूप येतो.
दररोज बिट खाल्ल्याने शरीरास होतात ‘हे’ लाभदायक फायदे; वाचा सविस्तर माहिती
नव्याने नियुक्ती झाल्याने हुरूप आला…
अजित पवार यांनी चंद्रशेखर बावन्नकुळे हे फक्त प्रसिद्धीसाठी बारामतीला आले, असा टोला लगावला. भाजपचे प्रांत अध्यक्ष यांची नव्याने नियुक्ती झालीय. त्यांना हुरूप आला. बारामतीला आले नसते तर एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. ते इथे आले म्हणून प्रसिद्धी मिळाली असा सणसणीत टोला देखील अजित पवारांनी चंद्रशेखर बावन्नकुळे यांना लगावला आहे.