दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागतोय. भरधाव वेगात चालणारी वाहने हे अपघाताचे ( Road Accidents) सर्वात मोठे कारण आहे. तसेच वाहतुकीचे नियम न पाळल्याने देखील मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी कठोर नियम व निर्णय घेतले जातात. दरम्यान बारामती तालुक्यात याबाबत नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. इथून पुढे बारामतीमध्ये ‘स्पीडगन’ ( Speedgun in Baramati) च्या सहाय्याने भरधाव वाहनांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
दुग्धव्यवसायाला चालना मिळण्यासाठी दूध संघटनेचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर
बारामती मधील रस्त्यांवर भरधाव वेगात पळणाऱ्या वाहनांना व वाहनचालकांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाने विशेष लक्ष घातले आहे. रस्त्यावर पळणारी भरधाव वाहने दिसल्यास वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई देखील इथून पुढे याठिकाणी होणार आहे. बारामती-जेजुरी- पुणे रोडवर गाड्यांच्या वेगाला 80 किलोमीटर प्रतितास अशी मर्यादा ठेवण्यात आली आहे.
दगडखाणी बंद करून दंडात्मक कारवाई करा; महसूल मंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
बारामती-जेजुरी- पुणे ( Baramati – Jejuri- Pune) रस्ता सुस्थितीत असल्याने याठिकाणी गाड्या सुसाट पळत आहे. यामुळे येथे अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे. यावर उपाय म्हणून प्रशासनाने या रोडवर चांगलीच नजर ठेवली आहे. मागील काही दिवसांत या रोडवर तब्बल 35 जणांवर कारवाई करण्यात आली व त्यांना 2000 रुपयांचा दंड देखील भरावा लागला. यामुळे इथून पुढे बारामतीत भरधाव वेगात पळणाऱ्या गाड्यांची दंडापासून सुटका नाहीच.
गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर