Baramati Agro । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! रोहित पवार यांना मोठा धक्का, बारामती ॲग्रो कंपनीला सरकारची नोटीस; दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश

Rohit Pawar

Baramati Agro | सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीला मध्यरात्री दोन वाजता नोटीस देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. बारामती ॲग्रो कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही नोटीस पाठवली आहे. नोटीस पाठवत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन प्लांट बंद करण्याच्या देखील सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सुडामधून ही कारवाई करण्यात आल्याचे आरोप रोहित पवार यांनी केले आहेत. याबाबत रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. (Rohit Pawar Tweet)

Ganpati Visarjan । अतिशय धक्कादायक घटना! गणेश विसर्जनाच्या वेळी युवक गेला पाण्यात वाहून

काय आहे रोहित पवार यांचे ट्वीट….

राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली.

युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे.

Accident News । मोठी दुर्घटना! चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रक रिक्षावर उलटला; ४ जण जागीच ठार

हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही.

आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु मधील युवा आणि जनता सरकारला नक्कीच ‘रिटर्न गिफ्ट’ देईल, ही खात्री आहे.

असो!पण सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील. असं ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

Kolhapur News । मोठी बातमी! कोल्हापुरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत तुफान राडा; दगडफेकीत तीन जण जखमी

Spread the love