Baramti News । देशातील लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अद्याप उमेदवार जाहीर झाले नसले तरी काही ठिकाणी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. यंदा सर्वांचे लक्ष हे बारामती लोकसभा मतदार संघाकडे लागले आहे. बारामतीतील लढत पवार कुटुंबीयांमध्येच होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून सुप्रिया सुळे पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या सध्या बारामतीच्या खासदार आहेत.
Ajit Pawar । अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला मोठा सल्ला
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची बातमी आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभेच्या उमेदवारी दिल्याच्या बातम्या येत असतानाच सुनेत्रा पवार यांच्या कामाचा आढावा घेणारा प्रचार रथ बारामतीत फिरू लागला आहे. त्यासाठी गाडीवर फ्लेक्स लावण्यात आले आहेत. यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या मोठ्या फोटोसोबत अजित पवार यांचा फोटोही लावण्यात आला आहे.
Sharad Pawar । पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर शरद पवारांनी जुनी खेळी खेळली; नेमकं काय घडतय?
कोण आहेत सुनेत्रा पवार?
सुनेत्रा पवार यांनी अद्याप कोणतीही निवडणूक लढलेली नाही. पर्यावरण आणि महिलांशी संबंधित उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाइटनुसार, सुनेत्रा 2010 मध्ये स्थापन झालेल्या एनजीओ एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या संस्थापक आहेत. भारतातील इको-व्हिलेज संकल्पना विकसित करण्यात त्या एक मार्गदर्शक होत्या. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे निकटवर्तीय वीरधवल जगदाळे यांनी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली होती.