Baramti News । लोकसभेच्या 2024 च्या निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेवल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांकडून मतदारसंघाची बांधणी केली जात आहे. भाजपने देखील या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. भाजपकडून मिशन 2024 सुरू झाले आहे. दरम्यान आता अजित पवार यांच्या बारामती मध्ये लोकसभेची तयारी भारतीय जनता पक्षाकडून सुरू करण्यात आली आहे.
Bjp । भाजपला मोठा धक्का! नांदेडमध्ये बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर मध्ये भाजपच्या 100 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली यावेळी, अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते घरोघरी पोहोचणार आहे. त्याचबरोबर घरोघरी जाऊन केंद्र सरकारच्या योजनांची देखील माहिती देणार आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील बारामती लोकसभा मतदारसंघात दौरा लवकरच होणार आहे. असा विश्वास भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, बारामती मतदारसंघातून आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे उमेदवार असणार आहेत. मात्र भाजप महायुतीचे उमेदवार कोण असणार आहेत? हे अद्याप निश्चित झालं नाही. त्यामुळे बारामती लोकसभा निवडणुकीतून भाजपकडून नेमकं कोण निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Supriya Sule । “देवेंद्र फडणवीसांबद्दल मला खूप वाईट वाटतं”, नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?