Baramti News । मोठी बातमी! बारामती कचरा डेपोला भीषण आग; 80 लाख रुपयांचे नुकसान

Baramti News

Baramti News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बारामती येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. आगीमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करणारी विविध प्रकारची यंत्रणा त्याचबरोबर कचरा जळून अक्षरशः खाक झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या आगीमुळे जवळपास 80 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. (Baramti News )

Chandrayaan 3 । देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा! भारत बनला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश

आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र याचा शोध नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे घेत आहेत. आज पहाटेच्या सुमारास कचरा डेपोला आग लागल्याची माहिती समजताच तेथील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लगेचच घटनास्थळी अग्निशामन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

Sharad Pawar । शरद पवार यांना मोठा धक्का बसणार? तीन आमदार देणार सोडचिट्ठी?

ही आग एवढी भीषण होती की, या आगीमध्ये बारामती नगरपालिका त्याचबरोबर लुको कंपनीची कचरा वर्गीकरण करणारी जवळपास सात ते आठ यंत्रे जळून खाक झाली आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही बसवलेले असून दोन वॉचमन देखील या ठिकाणी सातत्याने कार्यरत असतात. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही अशी माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे.

Crop Update । शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! पाण्याअभावी पीके धोक्यात

Spread the love