Baramti News । आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) पक्ष देखील चांगलाच कामाला लागला आहे. मनसेकडून पुणे जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनसेने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मध्ये मध्यवर्ती शाखेचे उद्घाटन केले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आले होते.
Sharad Pawar । शरद पवारांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार! अत्यंत जवळचा नेता अजित पवारांच्या संपर्कात
बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे भाजप सह मनसेलाही या मतदार संघात आपले वर्चस्व निर्माण करायचे आहे. बारामतीत राष्ट्रवादीचा पराभव करण्यासाठी भाजप कडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र आता त्याचबरोबर मनसेने देखील बारामती लोकसभा मतदारसंघात मध्यवर्ती शाखा सुरू केल्याने नवा ट्विस्ट निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी बारामतीत आपल्याला अजित पवार सापडल्याचं मिश्किल वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे म्हणाले, “आजचा कार्यक्रम फक्त कार्यालयाच्या उद्घाटनाचा आहे. वसंत मोरे हे अतिशय शिस्तबद्ध असून त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. बारामतीमध्ये अजित पवार सापडावा, मला माहिती नाही आमच्याकडे पण अजित पवार आहे. पण आयुष्यात मला कधी काका म्हणू नको”, असे मिश्किल वक्तव्य राज ठाकरे यांनी एका पदाधिकाऱ्याला उद्देशून केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.