Baramti News । सध्या बारामतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बारामती तालुक्यात विवाहितेचा हुंड्यासाठी छळ केला जात असून तिचे दोन्ही हात पाय बांधून शेततळ्यात बुडून मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप देखील व्यक्त केला जात आहे. बारामतीतील मासाळवाडी या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
याप्रकरणी चौकांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा व हुंडा प्रतिबंधक कायद्याखालील गुन्हा दाखल केला असून पती, सासू, नणंद व नंणदेचा पती या चौघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा मिळाला नसल्याने सासरचे लोक महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप आहे.
Ajit Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना दिले ‘हे’ ओपन चॅलेंज
वरील चारही आरोपींनी तिच्या घराशेजारी असलेल्या शेततळ्यामध्ये बुडवून महिलेचे हात बांधून तिला शेततळ्यात बुडून मारले अशी फिर्याद तिच्या वडिलांनी पोलिसांकडे दिली. त्यावरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. एवढ्या क्रूरपणे हुंड्यासाठी सुनेला मारणाऱ्या निर्दयी आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मृत मुलीच्या कुटुंबीयांनी मागणी केली आहे.