Baramti News : जालना घटनेच्या निषेधार्थ आज बारामती बंदची हाक; जाणून घ्या मोर्चाचा मार्ग

Call for Baramati bandh today to protest Jalna incident; Know the way of march

Baramti News : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. यानंतर राज्यभर याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी याचा तीव्र निषेध देखील करण्यात आला आहे. सरकारी बस पेटवून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Maratha Reservation । “फडणवीसांची भाजपमधून हकालपट्टी करा, नाहीतर ते मराठ्यांना गोळ्या घालून मारतील”

याच पार्श्वभूमीवर आज (04 सप्टेंबर) बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. ज्यामध्ये बारामती शहर आणि काही ग्रामीण भागात आज बंद पाळला जाणार आहे. जालना येथील घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. आता पुन्हा एकदा मराठा आरक्षाणाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

Sonia Gandhi । बिग ब्रेकिंग! सोनिया गांधी यांची तब्बेत अचानक बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

मोर्चचा मार्ग

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, कसबा- गुणवाडी चौक- गांधी चौक- भिवगण चौक असा मोर्चाचा मार्ग असणार आहे. त्यानंतर सभा आणि निवेदन होईल. यासाठी राजकीय नेते देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संपूर्ण मराठा समाजाने जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे असे देखील आव्हान करण्यात येत आहे.

Eknath Shinde । आताची सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या 5 सर्वात मोठ्या घोषणा

Spread the love