
अजित पवार यांनी आपल्या काही सहकारी नेत्यांसोबत राष्ट्रवादी पक्ष (NCP) फोडला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला धक्का बसलाच, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही खूप मोठा धक्का बसला. दरम्यान आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. मात्र बारामती मतदासंघामध्ये चित्र काही वेगळं दिसत आहे. पवार विरूद्ध पवार असं चित्र बारामतीमध्ये दिसत आहे.
Kangana Ranaut | ब्रेकिंग! “…ते सहन करू शकत नाही” अभिनेत्री कंगनाला बसला मोठा धक्का
मागच्या काही दिवसापासून पवार कुटुंबामध्ये वाद चालू आहेत. या वादावर शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी मोठं वक्तव्य केल आहे. माध्यमांशी बोलताना सरोज पाटील म्हणाल्या, “निवडणुकीपर्यंत हे ढग आहे, निवडणूक संपली की हे ढग निघून जातील, असे स्पष्ट मत त्यांनी माध्यमांशी बोलताना मांडले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पवार कुटुंबामध्ये फूट नाही. निवडणूक होईल, जे निवडून येतील ते येतील. निवडणुका झाल्यावर सर्व संपेल. असं देखील त्या म्हणाल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे शरद पवार आणि अजित पवार पुढील काळात एकत्र येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Sharad Pawar । पवार कुटुंबाच्या वादावर शरद पवारांच्या बहिणीचे सर्वात मोठे वक्तव्य!
त्याचबरोबर यावेळी त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कोण कोणावर भारी पडेल हे हे देखील विचारण्यात आले. माध्यमांनी सरोज पाटील यांना सुप्रिया सुळे जिंकणार की सुनेत्रा पवार जिंकणार? (Supriya Sule Or Sunetra Pawar) असा प्रश्न केला. त्यावर सरोज पाटील म्हणाल्या की मी, शिक्षिका आहे आणि माझं दोघींवर प्रेम आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.
Eknath Shinde । राज्याच्या औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीबाबत एकनाथ शिंदे यांचे सर्वात मोठे वक्तव्य!