महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारकडून अनेक नियम व कायदे बनविण्यात येतात. हे नियम दिवसेंदिवस इतके कडक होत आहेत की महिलांकडे चुकीने पाहणे देखील पुरुषांसाठी धोकादायक ठरत आहे. एखाद्या महिलेकडे 14 सेकंदापेक्षा जास्त वेळ पाहिल्याने पुरुषांवर गुन्हा नोंद होऊ शकतो.
सावधान! दुधाच्या पॅकेट मध्ये सापडले झुरळ; संबंधित कंपनीवर होणार कारवाई
कामाच्या ठिकाणी, महाविद्यालयांमध्ये व इतर सार्वजनिक ठिकाणी एखादा पुरुष महिलेकडे एकटक पाहत असेल ( man stares at woman) तर तो भारतीय दंड संहितेच्या कलम 294 व कलम 509 नुसार गंभीर गुन्हा होऊ शकतो. हे प्रकरण मुख्यतः छेडछाड हा श्रेणीत येते.
जोपर्यंत काट्यांबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही; राजू शेट्टी आक्रमक
वरील कलमांअंतर्गत एखाद्या महिलेकडे अथवा तरूणीकडे बघून अश्लील हावभाव करणाऱ्या, गाणी म्हणणाऱ्या किंवा इतर हावभाव करणाऱ्या पुरुषाला कमीत कमी तीन महिन्यांची शिक्षा होते. तसेच एक वर्षापर्यंत सश्रम कारावास व दंड अशी देखील शिक्षा होऊ शकते.
मनसेकडून गृहमंत्रालयाला इशारा; गौतमी पाटील वर कारवाई करा अन्यथा…
सरकारने महिलांसाठी असे नियम बनवले असल्याने किमान कामाच्या व इतर ठिकाणी महिला सुरक्षित राहत आहेत. परंतु, अनेक महिलांना या नियम व कायद्यांबाबत माहिती नसल्याने याबाबत जागृती होणे आवश्यक आहे.