
लोक पैसे कमावण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर कष्ट करत असतात. पण काही लोकांचं एका रात्रीत देखील नशीब बदलत. अशा घटना कायम घडत असतात. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशमधील (Uttarpradesh) भाटपारराणीमधील रघुनाथपूर येथील रहिवाशी . अरविंद सिंह कुशवाहा याने ड्रीम ११ हा खेळ खेळून फक्त ३५ रूपये लावून ७० लाख रूपयांचे बक्षीस जिंकले आहे.
सध्या सोशल मीडियावर (Social Media) अरविंदची जोरदार चर्चा चालू आहे. दरम्यान, शुक्रवारी भारत आणि न्यूझीलंड यामध्ये झालेल्या पहिल्या टी२० सामन्याने अरविंदचे नशीब पालटले आहे. त्याने ड्रीम ११ हा खेळ खेळून फक्त ३५ रूपये लावून ७० लाख रूपयांचे बक्षीस जिंकले आहे. त्यामुळे याची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे.
बिग ब्रेकिंग! गायक कैलाश खेर यांच्यावर जीवघेणा हल्ला
अरविंदने (Arvind) हे बक्षीस जिंकल्यानंतर गावामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक लोकांनी तसेच गावातील नेत्यांनी अरविंदचे स्वागत केले आहे.