शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 97 वी जयंती नुकतीच पार पडली. यानिमित्त त्यांच्या तैलचित्राचे अनावरण काल विधानभवनातील सेंट्रल हॉल मध्ये पार पडले. यावेळी बाळासाहेबांचे पुतणे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते.
खुशखबर! सर्वच कर्मचाऱ्यांना मिळणार मासिक 3 हजारांची पेन्शन
दरम्यान राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना आदरांजली वाहिली आहे. मी राजकीय पक्ष ( Political Party) काढू शकलो तो फक्त बाळासाहेबांमुळे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
देशातील 80 टक्के तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार; शरद पवारांचे मोठे वक्तव्य
यावेळी बोलताना ते म्हणाले की, ” मी लहानपणापासून बाळासाहेबांच्या अनेक गोष्टी बघितल्या आहेत. पराभव झालेले लोक बाळासाहेब ठाकरेंकडे यायचे तेव्हा, त्यांना सांभाळणारे बाळासाहेब मी पाहिले आहेत. वेगवेगळ्या पर्सनॅलिटी त्यांना भेटायला यायच्या तेव्हा ते त्यांच्याशी कसे बोलायचे हे मी पाहत आलोय.”
बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी आणि के एल राहूल अडकले लग्नबंधनात
लहानपणापासून मी त्यांच्या सहवासात राहिलो, त्यांच्या गोष्टी पाहू शकलो म्हणून मी स्वतःचा एक राजकीय पक्ष काढू शकलो नाहीतर माझी हिम्मतच झाली नसती. बाळासाहेबांमुळे मी यश आले तर हुरळून जात नाही आणि पराभव झाला तर खचून जात नाही.
मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजीनामा देणार? मोदींशी केली चर्चा