
निवडणूक आयोगाने काल ( दि.17) दिलेल्या निर्णयाने ठाकरे गटासह संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी सुरू केलेल्या संघटनेचे शिवसेना ( Shivsena) हे नाव व धनुष्यबाण पक्षचिन्ह ठाकरे गटाला न मिळता शिंदे गटाला मिळाले आहे. यामुळे मागील सहा दशकांचे ठाकरे व शिवसेना हे समीकरण कोलमडले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
बिग ब्रेकिंग! पुण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचा दावा व धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे शिवसेना पक्षाची घटना! शिवसेना पक्षाची जी घटना आहे ती लोकशाहीला धरुन लिहीलेली घटना नाही, असे निवडणूक आयोगाने म्हंटले आहे. तसेच ठाकरे गटाने पक्षात काही पदाधिकाऱ्यांची निवड केली होती. त्या निवडीवरही निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे.
लोकशाही ( Democracy) पायदळी तुडवून ठाकरेंनी पक्षात पदाधिकाऱ्यांची निवड केली. ही निवड कोणत्याही निवडणूकीशिवाय केली असल्याचे मत आयोगाने व्यक्त केले आहे. शिवसेनेच्या मूळ घटनेतील लोकशाहीविरोधातील नियम १९९९ मध्ये आयोगाने स्विकारले नव्हते. तरीही ते नियम न सांगता त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
यामुळे निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ( Shinde Group) शिवसेना व धनुष्यबाण दिले असल्याचे म्हंटले जात आहे. यामध्ये सादिक अली खटल्याचा संदर्भ देखील महत्त्वपूर्ण ठरला आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटी सत्याचाच विजय होतो. अशी प्रतिक्रिया दिली आहे.