राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) त्यांच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून ते चांगलेच चर्चेत आले आहेत. सध्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एक खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
“फक्त गुजरातला प्राधान्य देणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोभत नाही” – राज ठाकरे
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख आहे, यामध्ये कोणतेही सुख नाही. हे पद माझ्यासाठी योग्य नाही. अशी खंत कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिका बंद होणार?
नेमकं काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?
राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख आहे, यामध्ये कोणतेही सुख नाही. हे पद माझ्यासाठी योग्य नाही. कधी कधी मला असं वाटतं की मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे. अशा शब्दांमध्ये कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात जैन समाजाला संबोधित करताना बोलत होते.
भीमा पाटस साखर कारखान्याचे पहिल्या पंधरा दिवसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा