Beed News । सध्या दिवसेंदिवस गुन्हेगारी ही वाढतच चालली आहे. राज्याच्या अनेक भागात वेगेवेगळे गुन्हे घडतच आहेत. बीड या ठिकाणी देखील दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. सध्या वेश्याव्यवसायची प्रकरणे वाढत आहे. पुण्यासोबतच आता बीडमध्ये देखील वेश्याव्यवसायाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
Accident । स्टेजवर 6 मुली नाचत होत्या, क्षणात कोसळले स्टेज; पाहा अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ
बीड बायपासच्या सेनानगरातील बंगल्यात वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत माहिती मिळताच सापळा रचत सिडको पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. २० जानेवारीला ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. वेश्या व्यवसायचालकासह बीड बायपासच्या बंगल्यातून पाच जणांना अटक केली आहे.
Ram Mandir News । 392 खांब, 44 दरवाजे, नगर शैली…जाणून घ्या अयोध्येतील राम मंदिराची खास वैशिष्ट्ये
याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीच्या दोन तरुणींसह एका विदेशी तरुणीची देखील सुटका केली आहे. माहितीनुसार, हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या टोळीचे राजपूतच्या टोळीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. त्याचबरोबर एका लेडी डॉनला देखील याप्रकरणी पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे.