Beed News । मागच्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्यातील मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते. मात्र आता त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल जालना या ठिकाणी त्यांची भव्य अशी जाहीर सभा झाली. यासाठी राज्यभरातून लाखो नागरिक आंतरवाली सराटी येथे दाखल झाले होते. डोळे दिपवणारी ही गर्दी होती. मात्र सध्या या ठिकाणाहून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Ranbir Kapoor । आलिया भट्ट बद्दल रणबीर कपूरने केला मोठा खुलासा; म्हणाला, “ती दररोज…”
उन्हाचा तडाखा खूप असल्याने मराठा बांधवांना काही प्रमाणात त्रास देखील सहन करावा लागले. दरम्यान सभेसाठी आलेल्या एका बांधवाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी आलेल्या 36 वर्षीय बांधवाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
माहितीनुसार हा बांधव गेवराई या ठिकाणाहून या सभेसाठी जालन्यात आला होता. (Latest Marathi News) यावेळी त्याला चालून चालून दम लागला आणि चक्कर आली. यानंतर अँब्युलन्समधून त्याला दवाखान्यात हलविण्यात आले मात्र गर्दी असल्यामुळे अँब्युलन्सला दवाखान्यात जायला उशीर झाला आणि तरुणाचा त्या मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
Accident On Samriddhi Highway । समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! १२ जण जागीच ठार तर २२ जण जखमी