‘टप्पू के पापा’ आपणा सर्वांच्याच परिचयाचे आहेत. जेठालाल या नावाने प्रचंड ओळखले जाणारे ‘दिलीप जोशी’ यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनातील काही खास गोष्टी जाणून घेऊया. अभिनेता होण्यापूर्वी दिलीप जोशी एक ट्रॅव्हल एजंट (Travel Agent) म्हणून काम करायचे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta ka ooltah chashmah) ही मालिका लहानांपासून मोठ्यांपर्यंत पोहोचली आहे. या मालिकेतील जेठालाल यांची भूमिका खूप लोकप्रिय आहे. जेठालालच्या त्या भूमिकेमुळेच दिलीप जोशी लोकांना प्रचंड आवडतात. त्यामध्ये त्यांनी केलेली कॉमेडी ही सर्वांच्या पसंतीस उतरते.
खेळता खेळता स्मशानभूमीजवळ गेला अन् चार वर्षाच्या चिमुकल्यासोबत घडलं भयानक; वाचून बसेल धक्का
आज जेठालाल यांचा ५६ वा वाढदिवस आहे. दिलीप जोशी हे केवळ मालिकांमध्ये नाही तर, चित्रपटांमध्ये देखील झळकले आहेत. बॉलीवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) याच्यासोबत दिलीप जोशी यांनी बॉलीवूडच्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यांनी नेमकं कोणत्या चित्रपटात काम केलं हे आता कोणाच्या लक्षातही नसेल. तर दिलीप जोशी यांनी १९८९ साली प्रदर्शित झालेल्या ‘मैंने प्यार किया’ (Maine pyaar Kiya) या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात त्यांनी एका नोकराची भूमिका केली होती. तर एक काळ असा होता की ते ट्रॅव्हल एजंट होते.
राष्ट्रवादीला मोठा धक्का! बड्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश
“ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करत होतो” हे दिलीप जोशी यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले होते. मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, ट्रॅव्हल एजंट होते तेव्हा त्यांना १२ तास काम करावं लागत होतं. पण या कामावर त्यांना जास्त प्रॉफिट होत नव्हतं. ते ज्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करत होते तिथे ते त्या ट्रॅव्हल एजन्सीचे पार्टनर होते. त्यांचं कामाचं शेड्युल हे सकाळी नऊ ते रात्री नऊ एवढे होते.
सर्वात मोठी बातमी! भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी?, खुद्द शिंदे गटाच्या खासदाराने केले गंभीर आरोप
त्यांच्या कामाविषयी सांगताना जोशी म्हणाले की, ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ट्रीप बुक करणाऱ्या लोकांसाठी ते लक्झरी बसचा बंदोबस्त करायचे. ती बस मुंबई ते अहमदाबाद आणि मुंबई ते भावनगर अशी चालायची. दिलीप जोशी यांनी १९९० मध्ये जयमाला यांच्याशी विवाह केला होता. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलाचं नाव ऋत्विक जोशी (Rithvik Joshi) आणि मुलीचं नाव नियती जोशी (niyati Joshi) आहे.
डॉक्टरांनी मृत घोषित केले, काही वेळातच मृत रुग्णाचे पाय हलले अन्…; पुढील घटना वाचून बसेल धक्का