Virat Kohli । वर्ल्ड कप सामन्यांना अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. यावर्षी भारतात वर्ल्ड कपचे (ODI World Cup 2023) सामने आयोजित केले आहेत. त्यामुळे चाहत्यांना आणखी उत्सुकता लागली आहे. सर्व संघ या सामन्यांपूर्वी सराव सामने खेळत आहेत. भारतीय संघ वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. परंतु त्यापूर्वी भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने धक्कादायक निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)
त्यामुळे वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण कोहलीने सामन्याच्या (ODI World Cup) काही तासांपूर्वी संघाची साथ सोडली आहे. तो मुंबईला परतला आहे. संघाचा पहिला सराव सामना गुवाहाटीत (Guwahati) होता. त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी इतर खेळाडू हे गुवाहाटीवरुन तिरुवनंतपुरमला निघाले. परंतु विराट टीम मॅनेजमेंटची परवानगी घेऊन मुंबईला (Mumbai) रवाना झाला.
Raju Shetti । साखरेचे एकही पोते कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टी यांचा गंभीर इशारा
वैयक्तिक कारणामुळे तो मुंबईला परतला आहे. विराट सोमवारी संध्याकाळपर्यंत तिरुवनंतरपुरम या ठिकाणी पोहचून संघासोबत जोडला जाईल, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, 3 ऑक्टोबर रोजी तिरुवनंतपुरममध्ये कमाल तापमान हे 29 डिग्री तर किमान 24 डिग्री सेल्सियस असणार आहे. 90 टक्के या सामन्यावर पावसाचं सावट आहे.
वनडे वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
Rohit Patil । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! रोहित पाटील यांची बिघडली तब्येत, डॉक्टरांचं पथक दाखल