Gulkand: गुलकंद खाल्ल्याने शरीरास होतात हे फायदे; वाचा सविस्तर

Benefits of eating gulkand for the body; Read in detail

मुंबई : गुलकंद हा गुलाबाच्या फुलापासून तयार केला जातो. गुलकंद हा खूप चविष्ट तर असतोच पण गुलकंद खाण्याचे आरोग्यास खूप फायदे आहेत. जर आपल्याला लघवीबाबत काही त्रास होत असेल तर गुलकंदाचे खावे. आयुर्वेदातही गुलकंदाचा वापर प्रामुख्याने अनेक औषधांमध्ये केला जातो. गुलकंदामध्ये व्हिटामिन सी, ई आणि बी मोठ्या प्रमाणात असते. याच्या सेवनाने शरीर थंड राहते. त्यामुळे उन्हाळ्याचा कोणाला त्रास होत असल्यास गुलकंद सेवन करावे.

जाणून घ्या गुलकंदाचे फायदे –

  • दररोज दुधासोबत एक चमचा गुलकंद खाल्ल्याने मेंदूचे कार्य जलद होते.
  • दररोज गुलकंदाचे सेवन केल्याने त्वचा उजळते. त्याचबरोबर रक्त शुद्धीकरण देखील होते.
  • गुलकंद खाल्ल्यामुळे थकवा दूर होतो. हे एक शरीराला एनर्जी देणारे हे टॉनिक आहे.
  • गुलकंद दररोज खाल्ल्याने शरी ताजेतवाने राहते.
  • रात्री झोपण्यापूर्वी दुधाबरोबर गुलकंद खाल्ल्यास मन शांत होते. दुध आणि गुलकंद मुळे मेंदूतील मेलाटोनिन हार्मोन जास्त प्रमाणात तयार होते व त्यामुळे मन शांत होऊन चांगली झोप देखील लागते.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *