Site icon e लोकहित | Marathi News

हिवाळ्यात गुळ खाण्याचे फायदे; या आजारांतून होते सहज सुटका!

हिवाळ्यात गुळ खाण्याचे फायदे;

हिवाळ्यात वातावरण थंड (cold Atmosphere) असते. याचा आपल्या आरोग्यावर फरक पडत असतो. या दिवसांत अनेक आजार देखील होत असतात. यावर उपाय म्हणून या दिवसांत लोक उष्ण पदार्थ खातात. यामध्ये गुळाचा देखील समावेश होतो. थंडीच्या दिवसांत गूळ (Jaggery) खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. यामुळे अनेकदा डॉक्टर सुद्धा थंडीच्या दिवसांत गुळ खाण्याचा सल्ला देतात. दरम्यान हिवाळ्यात गुळ खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत असायलाच हवेत.

कापूस उत्पादक होणार आता मालामाल! महाराष्ट्रात राबविला जाणार ‘हा’ उपक्रम

1) रक्ताभिसरण सुरळीत होते
हिवाळ्यात सकाळी व रात्री कडाक्याची थंडी असते. मात्र दुपारी ऊन देखील पडते. या सततच्या वातावरण बदलामुळे या दिवसांत रक्ताभिसरणाचा वेग मंदावतो. यासाठी या दिवसांत गुळ खाणे फायदेशीर ठरते. गुळ खाल्ल्याने उष्णता निर्माण होते व गुळात असणाऱ्या लोहा मुळे रक्ताभिसरणाची गती देखील वाढते.

इतिहासाच्या पाऊल खुणा जपण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय ; ऐतिहासिक गड-किल्ले, मंदिरे व स्मारकांसाठी कोटींचा निधी मजूर

2) छाती जड होत नाही
थंडीच्या दिवसांत दमा व ब्राँकायटिसचा त्रास असणाऱ्या लोकांमध्ये छाती जड होण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी गुळ खाणे चांगले असते. गुळामध्ये असणाऱ्या अँटीबॅक्टरियल आणि अँटी इम्प्लॉयमेंटरी गुणधर्मांमुळे फुफुसांमधील सूज कमी होऊन यामध्ये जाणवणारा जडपणा कमी करण्यास मदत होते.

खुशखबर ! महामार्गावरील टोल नाके आता बंद होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

3) पोटातील गॅस ची समस्या कमी होते.
गुळाचे सेवन केल्याने पोटातील अ‍ॅसिडीक पीएच ( It maintains Acidic PH) योग्य राहण्यास मदत मिळते. म्हणून थंडीच्या दिवसांत गुळ खाल्ल्याने अ‍ॅसिडीटी आणि पोटात सतत होणाऱ्या गॅसपासून सुटका मिळण्यास मदत होते.

या कारणांमुळे हिवाळ्यात गूळ खाणे आरोग्यदायी समजले जाते. आपले आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. ते जपण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत.

अभिरूप युवा संसद स्पर्धेत एमजीएम प्रथम

Spread the love
Exit mobile version