
मागच्या काही दिसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे त्यामुळे सरकारची तसेच सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांपासून समोर आलेल्या आकडेवारीत नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
सर्वात मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या
गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 3,824 नवीन रुग्ण समोर आले आहेत, जे गेल्या सहा महिन्यांतील एका दिवसात नोंदलेली सर्वाधिक नवीन प्रकरणे आहेत. त्याचबरोबर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18,389 वर पोहोचली आहे.
बागेश्वर बाबांनी साईबाबांविषयी केले मोठे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, “कोल्ह्याची कातडी घालून कोणी…”
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोविड-19 चे 3,824 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4,47,22,605 झाली आहे. त्याचबरोबर संसर्गामुळे आणखी पाच रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या 5,30,881 वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत दिल्ली, हरियाणा, केरळ आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एका संक्रमित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
खळबळजनक! पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला, जागीच झाला मृत्यू