रस्त्यावर अनेकदा आपल्याला मोकाट सोडलेली जनावरे दिसतात. या जनावरांमुळे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना व वाहनांना त्रास होतो. तसेच इतर नुकसान देखील होते. दरम्यान राज्य सरकारने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. मोकाट जनावरांच्या समस्येला आळा घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
सर्वसामान्यांना झटका! सणासुदीच्या मुहूर्तावर LPG सिलेंडरमध्ये झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ
राज्य सरकारच्या ( State Government) निर्णयानुसार, यापुढे रस्त्यावर मोकाट जनावर सोडणाऱ्या मालकाला 1500 रुपयांऐवजी 5 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. यासाठी ‘महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक 2023’ द्वारे दंडाची रक्कम वाढवून 5 हजार रुपये केली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत हे विधेयक मांडले होते.
राज्यातील तीन हजार महिला दुबईमध्ये अडकल्या; रुपालीताई चाकणकर यांनी दिली धक्कादायक माहिती
यावेळी गिरीश महाजन ( Girish Mahajan) म्हणाले की, ग्रामीण भागात नागरिकांना मोकाट जनावरांचा खूप त्रास होत असून अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध, आठवडी बाजाराच्या ठिकाणी मोकाट जनावरे बसलेली असतात. अनेकदा ही जनावरे झुंडीने शेतात घुसून पिके उद्धस्त करतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
विधानसभेत अजित पवारांनी उडवली गिरीश महाजनांची खिल्ली; म्हणाले, “अंकल… अंकल… काकीला नाव सांगेन”
एवढेच नाही तर अनेक ठिकाणी मोकाट जनावरांकडून नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत. वर्दळीच्या रस्त्यांवर मोकाट जनावरे बसून राहत असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
राज्यसेवा 2021 ची गुणवत्ता यादी जाहीर! सांगलीचा प्रमोद चौगुले ठरला सलग दुसऱ्यांदा अव्वल