
‘सुखाची झोप’ मिळावी यासाठी माणूस हर तऱ्हेने प्रयत्न करत असतो. झोप ( Nap) ही लोकांच्या आयुष्यातील सर्वात समाधानकारक क्रिया असते. त्यातल्या त्यात दुपारची झोप म्हणजे स्वर्गसुख ! दुपारच्या झोपेला वामकुक्षी म्हणतात आणि अनेक लोकांना दुपारी झोपायला आवडते. मात्र आता याबाबत आम्ही जी माहिती सांगणार आहोत, ती वाचून तुम्हाला धक्का बसू शकतो. ( Side effects of afternoon nap)
HSC & SSC Results | ‘या’ दिवशी लागणार दहावी बारावीचा निकाल
दुपारची झोप ( Afternoon Nap) घेतल्याने बहुतांश लोकांना प्रसन्न वाटते मात्र एका संशोधनानुसार, दुपारची झोप शरीरासाठी प्रचंड हानिकारक असते. दुपारी झोपल्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर आणि चयापचन प्रक्रियेवर चुकीचा परिणाम होतो. यामुळे आपले मोठ्या प्रमाणात शारीरिक नुकसान होते.
सिमकार्डबाबत समोर आली मोठी अपडेट! एका आयडीवर मिळणार फक्त ‘इतके’ सिमकार्ड; लवकरच येणार नवीन नियम
दुपारी झोपल्यामुळे लठ्ठपणा वाढतो. एवढंच नाही तर उच्च रक्तदाब ( High Blood Pressure) , ह्र्दयविकार (Heart Problems) , मधुमेह( Diabeties) यांसारख्या भयंकर आजारांना आमंत्रण देण्यासाठी दुपारची झोप पुरेशी आहे. म्हणजेच काय तर, दुपारी झोपल्याने माणसाला गंभीर आजारांना व समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून दुपारी फार वेळ झोपू नये.
Baramati | मोठी बातमी! अजित पवारांच्या बारामतीतील घराशेजारी तरुणीचा विनयभंग; दादा भडकले, म्हणाले…
महत्त्वाची बाब म्हणजे दुपारी झोप घेण्याला अनेकजण ‘पॉवर नॅप’ म्हणतात. मात्र पॉवर नॅप फक्त १० ते १५ मिनिटांपर्यंत ठीक असते. त्यापुढे आणखी वेळ तुम्ही झोपत असाल तर तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. असे एका संशोधनात सांगण्यात आले आहे. यामुळे वेळीच शहाणे व्हा आणि आपले आरोग्य जपा !
LIC ची सरल पेन्शन योजना! वर्षाला मिळणार एक लाखांपर्यंत पेन्शन, जाणून घ्या सविस्तर..