Eye Flu । पावसाळा म्हटलं की रोगराई आलीच. राज्यात मागील काही दिवसांपासून साथीचे रोग (Epidemic diseases) झपाटयाने पसरत आहे. त्यापैकी एक रोग म्हणजे डोळे येणे. ॲडिनो (Addino) विषाणूमुळे डोळे येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पुणे शहरानंतर बुलढाण्यात मोठ्या संख्येने डोळ्याच्या साथीचे रुग्ण (Eye Flu Patient) आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून (Department of Health) करण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे मुंबईत अजून डोळे येण्याच्या संसर्गामध्ये वाढ झाली नाही. परंतु मुंबईत सध्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हवेतील आर्द्रता वाढून डोळे येण्याची विषाणूजन्य साथ पसरण्याची दाट शक्यता आहे. हा आजार वेगाने पसरू नये म्हणून त्यासाठी विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. जाणून घेऊयात याची लक्षणे (Eye Flu Symptoms) आणि उपाय.
लक्षणे
- डोळे लाल होणे.
- सतत त्यातून पाणी येणे.
- डोळ्याला सूज येणे.
Accident News । ब्रेक फेल झाल्याने बसचा भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू
अशाप्रकारे घ्या डोळ्यांची काळजी
- सतत हात धुवा.
- सतत डोळ्यांना हात लावणे टाळावे.
- तुमच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवून माशा, चिलटांचे प्रमाण कमी करणे.
- डोळे आलेल्या व्यक्तीचं घरातच विलगीकरण करणे.
सर्वात मोठी बातमी! लवकरच काँग्रेस पक्ष फुटणार, भाजपच्या बड्या खासदाराचा खळबळजनक दावा